उमरगा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त विद्यासागर हिरमुखे यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भुसणी शाळेस आकस्मिक भेट दिली असता शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गोविंद सोमवंशी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यानंतर महाराष्ट्र राज्याचे परिवहन उपायुक्त विद्यासागर हिरमुखे यांच्या वतीने धाराशिव जिल्हा परिषदे अंतर्गत नासा अंतराळ संशोधन केंद्र वाशिंग्टन डी.सी.( U.S. A) येथे अंतराळ संशोधन केंद्र भेट सहल तालुकास्तरीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल इयत्ता सातवीतील अपर्णा डिगंबर हिरमुखे या विद्यार्थीनीला शैक्षणिक साहित्य पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन उपायुक्त विद्यासागर हिरमुखे यांनी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक गोविंद सोमवंशी यांचा सत्कार केले. महाराष्ट्र राज्याचे परिवहन उपायुक्त विद्यासागर हिरमुखे यांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. याबरोबरच शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी आणि शालेय विद्यार्थी खेळामध्ये प्राविण्य मिळवावे यासाठी विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी गावातील शिक्षणप्रेमी पालक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारी तसेच क्रीडा व विविध उपक्रमांना चालना देणारी ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.
