धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्यादिनांक 17 जुलै 2026 रोजीच्या पत्रानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाच्यानिर्देशानुसार राज्यतील मोटार वाहनांच्या वायुप्रदुषण नियंत्रण  तपासणी प्रमाणपत्राच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली. 

दुचाकी वाहनांसाठी नवीन सुधारीत दर 60 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी 120 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी वर चालणारी वाहने यासाठी 150 रुपये,डिझेलवर चालणारी वाहने यासाठी 180 रुपये पीयुसी साठी असे नवीन सुधारीत दर असून  या दरवाढीची  सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशीक परिवहन अधीकारी यांनी केले आहे.

 
Top