तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध कर्मचारी यांच्या जागा रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर आहे.
जागजी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक १ पद रिक्त, आरोग्य उपकेंद्र दाऊतपूर येथे समुदाय आरोग्य अधिकारी १ पद रिक्त, आरोग्य उपकेंद्र जागजी येथे १आरोग्य सेवक पद रिक्त, आरोग्य उपकेंद्र तेर येथे १ आरोग्य सेविका पद व १आरोग्य सेवक पद रिक्त आहे.रिक्त जागेमुळे उर्वरित कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण पडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी जागजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.