तुळजापूर  (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अणदूर, फुलवाडी, खुदावाडी आणि चिवरी येथील शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख विकास जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. चार गावांतील तरुणांच्या मोठ्या संख्येने झालेल्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यात रतन बनसोडे, महादेव कर्पे, प्रवीण गुंड, बालाजी कांबळे, मल्लिनाथ घोडके, दत्तात्रय एडके, तानाजी सोमवसे, काशिनाथ कांबळे, महेश लंगडे, मारुती हिप्पर्गे, मल्लिनाथ हजारे, संकेत कांबळे, चंद्रकांत स्वामी, अक्षय हजारे, योगेश कांबळे, रोहित धबाले, बलभीम गायकवाड, नंदू काळुंके, राजू इट्टलकर, महादेव शिंदे, मारुती बनसोडे यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी युवा नेते ऋषिकेश भैया मगर, काठीचे सरपंच सुजित भैय्या हंगरकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास जाधव, बाळू घुगे, गणेश देवसिंगकर, राहुल मुळे, शिवराज घोडके आदी उपस्थित होते. चार गावांतील तरुणांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाल्याने आगामी काळात तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

 
Top