भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यात जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल आणि पीएमसी अशा मिळून 116 शाळा आहेत. मात्र, यापैकी बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. तालुक्यात 40 शिक्षकांची पदे रिक्त असून पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात सहशिक्षकांची गुंजाळ वस्ती, उर्दू माणकेश्वर, आंबी, बिरोबाची वाडी, बेदरवाडी, हंगेवाडी, दांडेगाव, जेवणनगर, आष्टा, आष्टा वाडी, पाथरूड, वडगाव नळी, ईट, चांदवड, निपाणी, घुलेवाडी, गिरलगाव, माळेवाडी आणि पखरूड या शाळांमध्ये प्रत्येकी एक पद रिक्त आहे. मुख्याध्यापकांची बावी आणि वाकवड येथे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. विज्ञान-गणित पदवीधर शिक्षकांची राळेसांगवी, दांडेगाव, अंधारे वस्ती, वरूड, रामेश्वर, मात्रेवाडी, हिवरा, चांदवड, घाटनांदूर आणि निपाणी येथे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. तसेच भाषा विषयाच्या पदवीधर शिक्षकांची गोलेगाव, गणेगाव, वांगी (खु.) आणि बावी येथे पदे रिक्त आहेत.

याशिवाय भूम, ईट आणि वालवड येथे मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ईट येथे भाषा विषयाचे, तर भूम आणि वालवड येथे गणित विषयाच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या सर्व पदांची संख्या 40 आहे. त्यातच समायोजनातील ईट व आरसोली रसोली येथील दोन शिक्षक अद्याप उपस्थित झालेले नसल्याची माहिती आहे. शासनाने तालुक्यातील रिक्त शिक्षक पदांची भरती विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच समायोजनातील शिक्षकांनी संबंधित शाळांमध्ये तातडीने रुजू व्हावे, अशी मागणी होत आहे.


भूम तालुक्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 54 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी काही शिक्षक रिक्त असलेल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यासाठी शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न चालू आहेत.

- ए. एस. जगदाळे, शिक्षणाधिकारी, भूम


27 शाळांमधील कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणचे शिक्षणाधिकारी यांना बोलून तात्पुरत्या स्वरूपात रिक्त असणाऱ्या जागेमध्ये व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 

-पूजा विशाल ढगे

 
Top