धाराशिव (प्रतिनिधी)- IKS HEALTH यांच्या CSR फंडातून व सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या स्कूल किटचे वाटप दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी एकलव्य विद्या संकुल , मंगरूळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेकजी आयाचित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल किट व बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी एकलव्य माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर तसेच शिक्षक बालाजी शिरसागर, अण्णासाहेब मगर, संतोष बनसोडे, निर्मलाताई हुग्गे, राजाभाऊ कुंभार,ज्ञानेश्वर भुतेकर, खंडू काळे व कोंडीबा देवकर उपस्थित होते. स्कूल किट व बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून, त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई, IKS HEALTH कंपनी, जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक या सर्वांचे भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान व एकलव्य विद्या संकुल वतीने मनःपूर्वक आभार.
