कळंब (प्रतिनिधी)- कळंब पासून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेला शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुहास धाबेकर यांनी  बाजार समिती चे सभापती शिवाजी आप्पा कापसे  यांच्या वाढदिवसा निमित्त व  स्वातंत्र्याचा 80 वा वर्धापन  दिनाचे औचित्य साधून शाळेला कमान भेट दिली.

या वेळीगावातून प्रभात फेरी, संगीतावर कवायत संचलन, विद्यार्थी विविध गुणदर्शन आणि गुणवंताचा सत्कार आदी  उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी तालुका कळंब येथे  स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच एड. प्रणित डिकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  शाळेचे मुख्याध्यापक  संतोष भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर संगीतावर विद्यार्थ्यांनी कवायत संचालन केले. देशभक्तीपर गीते,भाषणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिष्यवृत्ती,नवोदय,मंथन, ज्युनिअर आयएएस, प्रज्ञाशोध आधी विविध परीक्षेत यश मिळविलेल्या शाळेतील गुणवंतांचा सत्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष सुहास  धाबेकर यांनी शाळेला कमान भेट दिली. या कमानीचे उद्घाटन कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात शेवटी जय हनुमान युवक मंडळ आणि नितीन काळे यांच्याकडून उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, माता पालक आणि ग्रामस्थांना  अलपोपहर देण्यात आला.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आशा पवार, रसिका आगरकर, संतोष मोहिते, सयाजी शिंदे, मध्यान भोजन कर्मचारी श्रीमती रुक्मिणी डिकले, मयुरी अनिल डिकले यांनी कष्ट घेतले.


 
Top