तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल प्रशालेतील सहशिक्षिका शारदा जगताप यांचा उस्मानाबाद तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिवलिंग हंकारे, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.