वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने ‌‘ई-कंटेंट आणि एज्युकेशनल रील्स' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नॉलेज ब्रीझ फाऊंडेशनचे संचालक व प्रशिक्षक भूषण कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

यावेळी संस्थेचे खजिनदार जयकुमार बापू शितोळे, प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे, मुख्याध्यापक सुहास थोरबोले, माजी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, मुख्याध्यापक संतोष माने, प्रा. डॉ. बालाजी देवकते व प्रा. डॉ. विश्वास चौधरी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे भूषण कुलकर्णी यांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ‌‘मेंटर' बनून ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास महाविद्यालयाची गुणवत्ता निश्चितच वाढेल, असे जयकुमार बापू शितोळे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी देवकते यांनी केले.

 
Top