धाराशिव (प्रतिनिधी)- भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.  संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, कविता, समूहगीते सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडला.

 
Top