धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 8 वा  स्वातंत्र्य दिन  विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला .

प्रथम प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वज गीत, महाराष्ट्रगीत झाले तर राष्ट्रभक्तीपर गीत संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या बालचमूने सादर केले. राष्ट्रध्वजाला एन.सी.सी. व स्कॉऊड व गाईडच्या ए.व्ही. शेंडगे व विश्वास शेवाळे व त्यांच्या संघाने मानवंदना दिली. त्यानंतर प्राचार्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना संदेश देताना स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्या खास शैलीत समजावून सांगितले.

यावेळी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्था सदस्य पी .एल. गाडे, के. के. जाधव,संतोष कुलकर्णी, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, सेवानिवृत्त शिक्षक राष्ट्रपती पारितोषिक विजेते विज्ञान  शिक्षक युसूफ पठाण, एस. बी. कोळी,अरूण बोबडे, घाटगे , एन.एल. गोरसे, देटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक कुमार निकम, बी.बी. गुंड, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ,बालाजी गोरे, मोहनराव शिंदे, के.के .कोरके, शरद क्षीरसागर तसेच सर्व शाखेचे प्रमुख, कर्मचारी, विदयार्थी नवीन गणवेशात  मोठया संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे पार्श्वभूमीवर गणित  विषय शिक्षक भरत नाडे यांच्या संकल्पनेतून विविध राष्ट्र पुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी यावेळी  सर्वांचे लक्ष वेधले. त्याच बरोबर शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार 10 वी 12वी परीक्षेसाठीची विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त शपथ देण्यात आली. गुरुवर्य के .टी . पाटील सरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व संपूर्ण           वंदेमातरम्‌‍ ने सांगता झाली.

तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले  तर शेवटी  मुलांना अल्पोहार देण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील , सौ.जयमाला शिंदे  यांनी केले तर सर्वांचे आभार उपप्राचार्य संतोष घार्गे यांनी मानले.  या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा  पर्यवेक्षक कुमार निकम यांनी केले. त्यांना क्रीडा शिक्षक लक्ष्मण सांळूके, अभिजीत पाटील, प्रवीण बागल व सर्व सहकारी तसेच  नाईक, सुहास  ताटे,सर्व शिपाईवृंद  यांचे सहकार्य लाभले.

 
Top