धाराशिव (प्रतिनिधी)-  श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक तसेच शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. सभेस नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिवचे संस्थापक चेअरमन दत्ता कुलकर्णी यांनी सभासदांना 13 टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा केली.

सभेमध्ये संस्थेच्या ठेवी, कर्ज व्यवहार, एनपीए तसेच अनुषंगिक सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेत मांडण्यात आलेल्या विविध ठरावांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेने आजवर सभासद व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर केलेल्या प्रगतीचा आलेख यावेळी त्यांनी मांडला. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी, रोजगारनिर्मिती, आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीचे माध्यम बनले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी, संस्थेचे चेअरमन दिनेश कुलकर्णी यांनी सभासदांसाठी महत्त्वाची घोषणा करत सभासदांनी संस्थेत गुंतवलेल्या शेअर्सवर १३ टक्के लाभांश जाहीर केला. या घोषणेमुळे उपस्थित सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत सभासद, ठेवीदार व खातेदारांच्या विश्वासाला केंद्रस्थानी ठेवून सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, ग्राहकाभिमुख सेवा आणि सभासदांच्या आर्थिक गरजांना प्राधान्य देत संस्था सातत्याने कार्यरत आहे.

श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही धाराशिव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्यपणे कार्यरत असलेली संस्था असून, आगामी काळातही सभासद, ठेवीदार व खातेदारांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेच्या कार्याचा ठसा समाजमनावर उमटविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

या सभेस दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मीनाताई कुलकर्णी, सौ. प्रतिभा रामराव काळे, सौ. दिपाली कुलकर्णी, नितीन भोसले, मधुकर जाधव, बालाजी कोरे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वास कोकणे, प्रविण पाठक, राहुल काकडे, सुजित साळुंके, शिवाजी गिड्डे, दाजी आप्पा पवार, अभिजीत काकडे, प्रतिक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी, रामचंद्र सारडे, सौ. राधिका तानवडे तसेच संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top