धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ‌‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. मागणीची दखल न घेतल्यास 17 सप्टेंबर 2026 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप प्रेमचंद बनसोडे यांनी दिला आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना शनिवार 15 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत यापूर्वीही जिल्ह्यातील स्थानिक आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

 पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी प्रसेना प्रतिष्ठानने केली आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास 17 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात  आत्मदहन करण्यात येईल, असा  इशारा प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी दिला आहे.यावेळी प्रसेना प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 
Top