भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण यांची स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट घेऊन शहरातील विविध प्रलंबित व तातडीच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न यावेळी मांडण्यात आले. तसेच प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चव्हाण मॅडम यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. या भेटीप्रसंगी नगर परिषद बांधकाम सभापती तसेच भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा समन्वयक दिलीप शाळू महाराज, पाणीपुरवठा सभापती नवनाथ रोकडे, नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, नगरसेवक विठ्ठल बागडे, श्री शिवाजी खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश तात्या मस्कर, नगरसेवक अमोल गाडे, नगरसेवक राहुल पवार, विहंग कदम तसेच पत्रकार प्रल्हाद अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा होऊन लवकरच शहरातील प्रश्नांवर योग्य तो तोडगा निघेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


 
Top