धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडुन समाजसेवेचे वैश्विक कार्य घडते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संचालक डॉ. सोमिनाथ खाडे केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ.सोमीनाथ खाडे बोलत होते.

पुढे बोलताना डॉ.सोमीनाथ खाडे म्हणाले की, भारत देशामध्ये प्रत्येक शैक्षणिक संकुलामध्ये आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. भारतामध्ये 24 सप्टेंबर 1969 रोजी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू करण्यात आला. तेव्हापासून या विभागामार्फत स्वयंसेवकांच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय कार्य घडत आहेत. सदर प्रसंगी अण्णासाहेब कोल्हटकर, शैक्षणिक सेवा प्रकल्प यमगरवाडी, पत्रकार  देविदास पाठक, डॉ. बाळासाहेब मैंद, डॉक्टर विनोद कुमार व्हायचं, डॉक्टर मनीषा कळसकर, प्राचार्य, डॉ.डी.बी मोरे, डॉ.शिला स्वामी आदी उपस्थित होते.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. मारुती लोंढे यांनी केले. तर सुत्रसंचलन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी डॉ अवधूत नवले यांनी मानले.

 
Top