धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कळंबढोकी महामार्गावरील देवधानोरा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास हे आंदोलन करण्यात आले.
धानोरा गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. निकृष्ट दर्जाचे व अर्धवट सोडलेले काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच गावातील मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ बोंदर यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष गोपाळ घोगरे, धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी, कळंब तालुका सचिव सुरज बुधवंत, सुरज बोंदर, तालुका सचिव रामेश्वर थोरात, तालुका उपाध्यक्ष प्रशांत मगर यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
