धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार ओमदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील गणेश राऊत व त्यांचे सहकारी बबलू आकोसकर, सुरज घोगरे, अलीम तांबोळी, भैय्या माळी, गणेश जाधव, धनंजय खंडागळे, गणेश राऊत, कृष्णा आकोसकर, राहुल सूर्यवंशी, वैभव काकडे, सुरज काकडे, सुनिल पवार, किशोर कोळी, सचिन सर्जे, अतुल खराडे, धीरज गरड, रितेश गायकवाड व सुशांत गायकवाड यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेच्या विचारांवर आणि मा. एकनाथ शिंदे  व खासदार ओमदादांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात सहभागी झालेल्या सर्व नवनियुक्त शिवसैनिकांचे मनःपूर्वक स्वागत व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मनीषाताई वाघमारे, अक्षय खळदकर व सागर मोरे उपस्थित होते.


 
Top