धाराशिव (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी ता. बीड येथील आयोजित भव्य सत्कार समारंभात सतीश लोंढे यांना ‌‘समाजभूषण पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. 

कार्यक्रमास आप्पासाहेब उगीले, सुप्रसिद्ध शाहीर विजयानंद काटे आणि शाहीर राजन सरवदे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विशालजी भंडारे आणि किसनराव भंडारे यांनी केलं. नवगण राजुरीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांनी समाजासाठी निस्वार्थ कार्य करणाऱ्यांचा सन्मान होणं, हे समाजाला प्रेरणा देणारं असल्याचं सांगितले. सतीश लोंढे यांना प्रदान केलेला समाजभूषण पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव ठरला असून या सोहळ्याने गावासह संपूर्ण परिसरात सकारात्मक संदेश दिला.


 
Top