धाराशिव (प्रतिनिधी)- ट्रक खरेदी-विक्री व्यवहारातून साडेदहा दाखल रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथे घडला आहे. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजीराव दिनकर भोंडवे (रा. मोघा खुर्द, ता. लोहारा) यांनी सुनिल मच्छिंद्र पवार (रा. पोहोरगाव, ता. पंढरपूर) यांच्याशी एमएच 09 बीए 8631 या क्रमांकाच्या ट्रकचा 11 लाख रूपयांचा व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी 50 हजार रूपये देण्यात आले. मात्र उर्वरित 10 लाख 50 हजार रूपये देण्याचे टाळण्यात आले. सुनिल पवार हे थकीत रक्कम मागण्यासाठी मोघा खर्दु येथे गेले असता ठरलेली रक्कम न देता त्यांना चापटा मारून शिवीगाळ करण्यात आली. तसेच ट्रक व्यवहारातील 10 लाख 50 हजार रूपये देण्यात आले नाहीत. या प्रकरणी सुनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात बाजीराव दिनकर भोंडवे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.