धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर जिल्हा काँग्रेस कमिटी, धाराशिवची नवीन जिल्हा कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. 

जिल्हा काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी दौलतराव नामदेवराव माने, विलास बाळासाहेब शाळू, नाना दादाराव भोसले, ॲड. सय्यद हुसेन फिरसाहेब इनामदार, आयुब खान अजीज खान पठाण, सयाजीराव विजयकुमार देशमुख, सरफराज हमीद काझी, बाळासाहेब किसनराव गपाट, विजय महेंद्र वाघमारे, ॲड. जावेद रफिउद्दीन काझी, शामराव गणपत भोसले, राजेंद्र पांडुरंग शेंडगे आणि गौरीशंकर सिद्धप्पा मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खजिनदारपदी अशोक त्र्यंबकराव शेळके यांची निवड करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी नितीन शिवलिंग गाडवे, रमेशसिंह परदेसी (गोकुळसिंह), मधुकर पांडुरंग यादव, नादेर उल्ला कलीम उल्ला हुसेनी, बालाजी रूपचंद राठोड, रामचंद्र आलुरे आणि दिलीपराव भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी अशोक प्रभाकर भातलवांडे, अनंतराव साहेबराव घोगरे, श्रीकांत पुरुषोत्तम भालेराव, गजेंद्र हरिदास कदम, बालाजी गजेंद्र बंडगर आणि ॲड. दिलीप शंकरराव सागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष निमंत्रित म्हणून धीरज अप्पासाहेब पाटील, विश्वास आप्पा शिंदे, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील, डॉ. स्मिताताई शाहापूरकर, पांडुरंग तात्या कुंभार, मलंग शेख, राजाभाऊ शेरखाने, विजय मुद्दे, आप्पासाहेब पाटील, माधव अण्णा कुतवळ, रणजित दादा पाटील, दादासाहेब खरसडे, ॲड. गाजरे साहेब, उस्मान कुरेशी आणि सत्तार अहमद शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटन बळकट करणे, जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि काँग्रेस पक्षाची धोरणे व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी च्या नव्या नियुक्त्यांमुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अधिक गतिमान होईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top