तेर (प्रतिनिधी)- वाखरवाडी येथे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत पाणी फाउंडेशन फार्मर कप शेतकरी गट या शेतकरी महिलांची शेती शाळा घेण्यात आली.
यामध्ये कृषी व्यवस्थापक रोहिणी सुरवसे यांनी महिलांना पिकांवरील कीड व रोग याविषयी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. तसेच उपाययोजना करण्याचे सांगितले. तसेच कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती देऊन ऑनलाईन करण्यास सांगितले पिक विमा काढण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व महिलांना प्रत्येकी दोन फेरोमेन ट्रॅप व निंबोळी अर्क बॉटल फ्री मध्ये वाटप करण्यात आली. तसेच फेरोमन ट्रॅप प्रात्यक्षिक घेऊन माहिती सांगितली उपस्थित भाग्योदय महिला प्रभाग संघ सचिव व राजमाता महिला ग्राम संघ अध्यक्ष सोनाली शिंदे , ऐश्वर्या शिंदे, अंकिता शिंदे, सविता सुरवसे, सुमन सुरवसे, गोकर्ण पवार, विद्या सुरवसे, सविता सुरवसे, स्वाती सुरवसे, अक्षरा सुरवसे, मंगल शिंदे, पार्वती शिंदे व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
