भूम (प्रतिनिधी)-  विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करून सहभाग घेतला पाहिजे. या परीक्षा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त करून देत असतात असे प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख गफूर शेख यांनी केले. 

येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त सामान्यज्ञान व वरील दोन्हीही व्यक्तींच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञानावर आधारीत परीक्षा घेण्यात आली. यावेळी प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना माजी केंद्रप्रमुख गफूर शेख यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला काकासाहेब पवार, उत्रेश्वर पायघन, अविनाश जोशी, दत्तात्रय गुंजाळ, प्रतिभा मुकटे, नितीन पवार, कैलास शिंदे, सुनिल जाधवर, हरीश साठे, अनंता झरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले.

 
Top