तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावण मासातील दुर्गाष्टमी दिनी श्रावण शुक्ल पक्ष 8 दुर्गाष्टमी वार गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी हे तुळजाभवानी मातेच्या गर्भ गाहातील सिंहासनावर आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.
श्रावण मासातील दुर्गाष्टमी दिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन करणे भाविक पुण्याचे समजत असल्याने आज देवीचे भक्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनात मंदिरात गर्दी करतात. स्थानिक पुजारी वृद्ध दुर्गाष्टमी पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेस दही दुग्धाभिषेक करतात व रात्री देवीस दुर्गाष्टमीचा नैवध दाखवुन उपवास सोडतात. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनात श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होत असून हा भाविकांचा ओघ असाच श्रावण मासाच्या संपेपर्यंत राहणार आहे.
