तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले.तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अशोक पाटील , पंचायत समितीचे सदस्य आशिष सोनटक्के, भिवा इंगोले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच सुर्यकांत चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी हृदयरोग , नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग , त्वचारोग,कान नाक घसा,पोटाचे विकार आदी रोगावर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास  उपसरपंच अमृता चव्हाण , माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, लक्ष्मण राठोड, दामाजी राठोड,नेमिनाथ चव्हाण, सुभाष नाईक, विनायक चव्हाण, माणिक राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड,पांडुरंग चव्हाण, महादेव राठोड सुभाष चव्हाण, मोतीराम राठोड, बाबुराव चव्हाण, तानाजी राठोड, संदीप राठोड, सिताराम राठोड, वसंत चव्हाण,बाबु जाधव, विश्वनाथ चव्हाण वाय.आर.राठोड , माजी सरपंच ज्योतिका चव्हाण,ग्रा.प.सदस्या शांताबाई राठोड,रेखा चव्हाण, राजश्री चव्हाण, निर्मला राठोड, वंदना चव्हाण उपस्थित होत्या.या शिबिराचे 417 जणांनी लाभ घेतला.शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.सानिका साखरे, डॉ.रोहिनी दत्ता, डॉ. आकाश मकदूम, डॉ.मिताली ढोबळे, डॉ.अकांशा धडाम,आमिन सय्यद , आशा कार्यकर्ती रेश्मा चव्हाण,सिताबाई चव्हाण यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top