भुम (प्रतिनिधी)- पखरुड ता. भूम येथील जागृत सत्पुरुष,संत श्री.सच्चिदानंद स्वामिंच्या संजीवन समाधी सोहळा दि. 20 ऑगस्ट रोजी समाधीस सकाळी रुद्राभिषेकाने प्रारंभ झाला. 20 ते 23 ऑगस्ट या कालावधीत हभप.तुकाराम महाराज, हभप राजेंद्र महाराज किंबहुणे, हभप अक्रूर महाराज, हभप सुबोध महाराज, हभपधर्मराज महाराज सामगांवकर, हभप.शिवाजी महाराज जगदाळे यांच्या किर्त़नसेवा व शेवटी हभप राजेंद्र महाराज विभुते यांच्या कार्याचे किर्तनाने सांगता होणार आहे.तसेच रामकृष्ण महाराज पुरंदरे यांचे संगीत प्रवचन तर हभप. मकरंद उंडेगांवकर यांचे प्रवचन, पखरुड भजनी मंडळाचा जागर, अन्नदान आदी कार्यक्रम होत आहेत.
भूम येथील अंबादास देशपांडे संगीत विशारद सेवानिवृत्त स्टेट बॅक अधिकारी, यांचा अभंगवाणी, सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला. गायनाची सुरुवात पारंपारिक पंचपदीने करुन त्यानंतर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर, निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, माझे कोण आहे तुजविण देवा, विठ्ठल आवडी प्रेम भाव, संत संगतीचे काय सांगु सुख असे विविध संतांचे अभंग अतिशय खुबिने गायले. शेवटी शेवटची विनवणी संतजन परिसावी हा भैरवीत अभंग घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. तबला साथसंगत उल्हास जवाहिरे यांनी अतिशय पोषकपणे केली. तर सहगायनसाथ भैरु गुरुजी यांनी केली. कार्यक्रमानंतर गायकांचा सत्कार बेलेश्वर देवस्थानचे सेवेधारी दिपक महाराज पुरंदरे यांनी केला.
