तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा वाडी येथील पोलीस पाटील अण्णासाहेब कोळेकर यांना महसूल विभागाच्या वतीने ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार.परंडा येथे आयोजित महसूल विभागाच्या विशेष कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या हस्ते अण्णासाहेब कोळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, महसूल विभागाच्या विविध योजना व प्रशासकीय कामांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच ग्रामस्थांमध्ये सलोखा व शांतता कायम ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महसूल प्रशासनाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
