धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक,साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करण्यात आले.

यावेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने, मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे, तसेच अतुल लष्करे, आंबेडकरी चळवळीतील स्वप्निल शिंगाडे,राजाभाऊ गायकवाड,जगराम बनसोडे यांच्यासह इतर उपस्थित होते.हा कार्यक्रम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनिस्त व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित बाबीच्या जागेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घेण्यात आला, सुत्रसंचलन बलभीम कांबळे तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.

 
Top