धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय छावा संघटनेची मराठवाडा विभागीय बैठक बीड येथे शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडली या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. दादासाहेब अण्णासाहेब जावळे पाटील व अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांची नेतृत्वात पार पडली. या बैठकीमध्ये अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव जिल्हाप्रमुख कालिदास गायकवाड यांची निवड करण्यात आली यावेळी कालिदास गायकवाड यांना नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
