धाराशिव (प्रतिनिधी)-अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबाद यांच्या ख़िदमते ख़ल्क़ (मानव सेवा) विभागातर्फे 30 ऑगस्ट 2026 रोजी शहरातील विविध भागांमध्ये फूड ड्राइव्हचे आयोजन करून गरजू नागरिकांना सुमारे 120 फूड पॅकेट्स व बॉक्सचे वितरण करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमांतर्गत बस स्टँड, शॉपिंग कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, काळा मारुती चौक, मुख्य रस्ता, आझाद चौक, दर्गा परिसर तसेच शहरातील इतर भागांमध्ये गरजू व्यक्ती व कुटुंबांना अन्नपॅकेट्स वितरित करण्यात आले.

मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदियातर्फे अशा प्रकारचे मासिक मानव सेवा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. या माध्यमातून गरजू व्यक्तींना अन्न व आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमासाठी मजलिसच्या युवा स्वयंसेवकांनी अन्नपदार्थांचे नियोजन, पॅकिंग आणि वितरणाची जबाबदारी पार पाडली.

या कार्यक्रमात ख़ुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष राग़ेब अलीम, ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहराध्यक्ष नदीम अहमद, चिटणीस मानव सेवा सजी़ल अहमद, मक़बूल अहमद प्रचारक, अहमदिया मुस्लिम जमाअत तसेच मुताहिर अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद, मामून अहमद, शफीक अहमद, माज़ीन अहमद, मंज़ूम अहमद यांच्यासह इतर ख़ुद्दाम व जमाअती सदस्यांनी सहभाग घेतला. तसेच जमाअतचे ज्येष्ठ सदस्य आणि महिला संघटनेच्या सदस्यांनीही या मानवसेवा उपक्रमात सहकार्य व सहभाग नोंदविला.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top