धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील स्वातंत्र्य पूर्वकाळापासून कार्यरत असलेले व मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने उत्साहाने अभिवादनाने साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेची पूजा शिवछत्रपती पुरस्कारते, सेवानिवृत्त एसटी महामंडळातील विभागीय वाहतूक अधिकारी, हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राजकुमार दिवटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे सभासद व चलेंजर्स स्पोर्ट्स क्लबचे नामवंत खेळाडू वॉलीबॉल खेळाडू उपस्थित होते. मंडळाचे सात ते आठ शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले खेळाडू अंकुश पाटील, रवींद्र जानगवळी ,राजकुमार व गिरजप्पा दहीहंडे बंधू,, स्वर्गीय नलावडे बंधू इत्यादींन महाराष्ट्र शासनाने गौरविलेले मंडळ व धाराशिवकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे असे प्राध्यापक गजानन गवळी यांनी उल्लेख केला. ध्यानचंद यांच्या हॉकी खेळाविषयी व त्यांच्या कार्याविषयी व कर्तुत्व विषयी व जर्मनीचे मेजर हिटलर यांनी ध्यानचंद याला माझ्या देशाचे कायमचे नागरिकत्व व देशाकडून हॉकी खेळण्याची ऑफर, आर्थिक व सैन्य दलात मोठे पद इत्यादी देण्याचे ऑफर केली होत. ध्यानचंद यांनी ती नाकारली यातच भारताला हॉकी संघाला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे खेळातील व देशावरील अभिमानास्पद, प्रेम व निष्ठा हे दिसून येते. म्हणूनच राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा करिताना आजच्या या तरुण पिढीने यांच्या खेळ प्रेम, निष्ठा, जिद्द ,परिश्रम इत्यादी आदर्श घेण्यासारखे आहे असे दिवटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या आजच्या मोबाईल योगामध्ये अडकलेल्या व मैदानें ओस पडत आहेत व तरुण पिढीची शारीरिक व मानसिक, सामाजिक ,आर्थिक, घडी विस्कटत आहे,यासाठी मैदानावर रोज दोन ते तीन तास सकाळ संध्याकाळ खेळासाठी, व्यायामासाठी व त्याचबरोबर कसरतीसाठी वेळ देऊन भारतीय खेळाडूंची उणीव भरून काढणे गरजेचे आहे असे मा. प्राचार्य भालचंद्र हुच्चे मार्गदर्शन केले. अभ्यासाबरोबर खेळही अनुकरण करावे शासनाने खेळाडूंच्या साठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत यामुळे शैक्षणिक पात्रता व त्याचबरोबर खेळ याचा जीवनामध्ये मेळ बसवला गेला पाहिजे असे असे गुणवंत कामगार काशिनाथ दिवटे व मनमत पाळणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी लेझीमचे खेळाडू सर्व लहान थोर उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या नावाने देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो मूळ कारण खेळ आहे यावेळी या सर्व कार्यक्रमाचे संचलन व आभार दुर्गेश दिवटे व वरून साळुंखे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज अंजीखाने, विश्वास दळवी, दहीहंडी बंधू, तीर्थकर बंधू, मुझे मिल पठाण, युवराज हुच्चे, संजय पाळणे सापटे बसवेश्वर पाळणे केदार उपाध्ये मिलिंद वैद्य सुरवसे इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी ध्यानचंद यांच्या नावाचा जयजयकार भारत माता की जय वंदे मातरम गणपती बाप्पा मोरया अशा विविध घोषणाने समारोप करण्यात आला.
