तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाद्वार येथे दुपारपाळीत कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक माळी सोमनाथ यांना एक लेडीज पर्स सापडली. त्यांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेचे उदाहरण दाखवत सदर पर्स तात्काळ कंट्रोल रूम येथे जमा केली.

सदर पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये एक सोन्याचे गंठण, रोख रक्कम 9,987 रुपये, एक अँड्रॉइड मोबाईल तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित भाविकाचा शोध घेऊन व पर्सवरील मालकीची खात्री करून, सदर पर्स आणि त्यामधील सर्व वस्तू सुरक्षितपणे संबंधित भाविकाच्या ताब्यात देण्यात आल्या. संबंधित भाविक हे कोल्हापूर येथील असून शनिवारी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. सुरक्षा रक्षक माळी सोमनाथ यांच्या प्रामाणिकपणा व सतर्कतेमुळे भाविकाची मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 
Top