धाराशिव( प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांच्या मातोश्री कै.सौ. हिराबाई लोंढे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र सामनगाव येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. धर्मराज महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
कै. सौ. हिराबाई लोंढे यांचे आकर्षक असे मंदिर बांधण्यात आलेले असून नवीन तरुण पुढे एक मोठा आदर्श प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी उभा केला आहे. असे यावेळी ह भ प धर्मराज महाराज यांनी आपले मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या ए.आय. च्या काळात देखील श्रावण बाळ जन्माला येण्याची गरज भासत आहे. असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. लोंढे यांचे वडील श्री. अभिमान लोंढे, भाऊ श्री अर्जून लोंढे, श्री.शशिकांत भागवत, आदींनी केले होते. सदर कार्यक्रमासाठी लोणी गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
