तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील गणपती मुर्ती करणारे कलाकार गणपती उत्सव जवळ येत असल्याने गणपती मुर्तीवर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवत आहेत.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला श्री गणेशाची स्थापना केली जाते.गणेश उत्सव जवळ येत असल्याने गणपती मुर्ती तयार झाल्यानंतर गणेश मुर्तीवर रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.शाडू माती पाहिजे तेवढी उपलब्ध नसल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून गणपती तयार करण्यात येत आहेत.रंग आणि प्लस्टर आॅफ पॉरीस महाग झाले असल्याने वीस टक्के यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे.गणेश मंडळाची जसजशी गणेश मुर्तीची मागणी होईल त्याप्रमाणे गणेश मुर्ती बनविली जाते.गणेश मंडळापेक्षाही घरगुती गणपती मुर्तीस मोठ्या प्रमाणात भाविक भक्त यांची मागणी होत आहे अशी माहिती तेर येथील गणपती मुर्ती कलाकार सुदाम रावळे यांनी दिली.

 
Top