धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत राज्य शासनाच्या वतीने एन .डी आर .एफ यांच्या सहकार्याने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन शिबीराचे आयोजन करण्यात आले, शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. के मंजुळकर यांच्या हस्ते संपन्न झाले, सदरप्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आज तरुणांना गरजेचे आहे,कारण आज निसर्ग अचानक बदलत चालला आहे, भूकंप,पूर, अचानक लागलेली आग अशा विविध समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षण गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ मंजुळकर यांनी नमूद केले.यावेळी एन.डी.आर.एफ टीमचे प्रमुख   इन्स्पेक्टर नितीन सोकाशी यांनी अचानक भूकंप झाला तर प्रथम काय खबरदारी घेतली पाहिजे, अचानक अनपेक्षितपणे पावसाळ्यात मोठा पूर आला तर स्वतः सह इतरांचा बचाव कसा करावा,मानवी चुकांमुळे एखाद्या कारखान्यात अचानक आग लागली तर घाबरून न जाता काय उपाययोजना कराव्यात,कारण संकट जरी आले तरी माणसांना स्वतःच्या बचावासाठी संकट एक संधी देत असते आपणांस नेमके त्याच संधीचा फायदा घेण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.ते पुढे म्हणाले की आज माणसांचा आहार खुप बदलत चालला आहे, व्यायाम कमी होत चालला आहे आजमितीस असे दिसून येते की, खुप कमी वयातील मुलांना आणि मोठ्या वयाच्या लोकांना सुद्धा हृदय विकाराचे झटके येतात आणि अशावेळी या अचानक आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सी.पी.आर चे प्रशिक्षण गरजेचे आहे, यासंबंधी यावेळी सी.पी.आर चे कृत्रीम प्रात्यक्षिक देऊन माहीती देण्यात आली.प्रशिक्षण शिबिरामध्ये एन.डी.आर.एफचे एच.सी महादेव झेंडे, राहुल शिंदे,हिंगणे प्रविण, रॉबीन मिंज,तगड शरद,एम.महेंद्र , मंगेश शिंदे या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले,तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ अवधूत नवले, डॉ मारुती लोंढे, डॉ बालाजी गुंड,प्रा माधव उगिले यांच्या सह प्रा व्ही.एच चव्हाण यांनी सहकार्य केले.सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top