भूम (प्रतिनिधी)-येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला चंदन अमोल जगदाळे याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेतील वीस विद्यार्थी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) येथे भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केलेले आहे . यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तालुकास्तर व जिल्हा स्तरावर परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत चंदन जगदाळे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला . या मुलांच्या सहलीचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे . पवार काकासाहेब, उत्तरेश्वर पायघन, दत्तात्रय गुंजाळ यांनी त्याला मार्गदर्शन केले या यशाबद्दल मुख्याध्यापक तात्या कांबळे व सर्व शिक्षकांच्या हस्ते चंदन व त्याच्या पालकाचा गुलाल उधळून व आदल्या वाजवून अभिनंदन केले .कार्यक्रमाला काकासाहेब पवार ,उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी, दत्तात्रय गुंजाळ ,श्रीमती प्रतिभा मुकटे , नितीन पवार, कैलास शिंदे ,सुनिल जाधवर , हरीश साठे ,अनंता झरकर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले .
