भुम (प्रतिनिधी)- भूम तालूक्यातील माणकेश्वर येथे कुं भाग्यश्री अच्युतराव मुळे यांची माणकेश्वर येथील पोष्ट ऑफीसमध्ये डाक शाखाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने सेवा निवृत पोष्ट मास्तर आलीमियाँ जमादार यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहाय्यक शाखाधिकारी यश जाधव, उमर जमादार, अर्जून मुळे, हरीचंद्र पवार, न्यानोबा घावटे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना भाग्यश्री मुळे म्हणाल्या सेवा निवृत्त शाखा पोष्ट मास्तर आलीमियाँ जमादार यांनी 35 वर्ष प्रमाणीक सेवा करूण पोष्टाच्या विविध येजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ दिला. त्याच प्रमाणे पुढे ग्रामस्थांना सेवा देवून पोष्टाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येईल.
