धाराशिव (प्रतिनिधी)-  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेल्या नगरसेवकांनी पक्षांशी तसेच मतदाराशी गद्दारी केली आहे. या गद्दार नगर सेवकांना धडा शिकवू व यांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी माहिती दिली आहे. पेट्या, खोके याच्या कोणत्याही अमिषाला बळी न पडता पक्षांशी इमान राखणाऱ्या रवी वाघमारे व राज निकम यांच्याबद्दल पक्षाला अभिमान आहे असंही मत जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केल्याची माहिती जाधवर यांनी दिली आहे.

 
Top