कळंब (प्रतिनिधी)- पंचायत समितीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते या कार्यक्रमात कळंब तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच पत्रकारांचे गुणवंत विद्यार्थी व निराधार लहान गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात पत्रकाराचे जनक आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रजलात करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ अण्णा तोडकर संस्थापक पर्याय सामाजिक संस्था  तसेच अक्षय फाटक सीनियर रिपोर्टर पुणे, विशाल जाधव पोलीस निरीक्षक,  सोपान अकेले गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, सचिन शिवशक्ती विभागीय सचिव अखिल भारतीय परिषद, शकील शेख पोलीस निरीक्षक कळंब, रहीम शेख जिल्हाध्यक्ष अभाप, पीजे तांबारे उद्योजक पुणे, राजेंद्र बिक्कड आदर्श मुख्याध्यापक आढाळा, आदी मान्यवर चे हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात पुढे समाजात पत्रकारितेच्या माध्यमातून प्रदीर्घ सेवा देणाऱ्या आणि निर्भीडपणे जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकारांचे कार्य नव्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या ज्येष्ठ पत्रकारांमध्ये सतीश टोणगे, बालाजी अडसूळ, मुस्तान मिर्झा  बाळासाहेब जाधवर, सुभाष घोडके  धनंजय घोगरे, माधवसिंग राजपूत, आधी ज्येष्ठ  पत्रकारांचा समावेश होता. त्याचबरोबर कळंब येथील नवयुग कापड व्यापारी मयूर रुणवाल, विठ्ठल माने, जाफर शेख, यांचा देखील गुणगौरव करण्यात आला. या सौहळ्यात महिला शक्तीच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड झालेल्या सामाजिक कार्यकर्ता ज्योतीताई सपाटे यांचा देखील सन्मान करण्यात आला. याच सोहळ्यात दहावी, बारावी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले. 

याच कार्यक्रमात 18 वर्षे मिल्ट्री मध्ये सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा देखील सत्कार करून एक प्रकारे देशसेवेला हातभार लावल्यासारखं सभागृहात वातावरण निर्माण झाले असून नगरपरिषद शाळेच्या दहा गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव सिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन जाफर शेख यांनी तर आभार प्रदर्शन मुस्तान मिर्झा यांनी मानले. या सोहळ्याला पत्रकार बांधव, पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अमर चोंदे, सुधाकर रणदिवे, श्रीकांत बरकते  राहुल गाडे  अतुल मडके, शिवाजी बोबडे आदी पत्रकारांनी परिश्रम घेतले.


 
Top