धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत येडाई नशामुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नशामुक्ती अभियान राबविले गेले.
यावेळी नशामुक्ती केंद्र प्रमुख डॉ. संदीप ताबांरे, संचालक, यश मेडीकल फाउंडेशन हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज आपल्या समाजात तरुण वर्ग व्यसनाधीनतेच्या जास्त आहारी जात आहे, तरुण वयात भविष्यातील जीवनाचे नियोजन करणे गरजेचे आहे, सिगारेट, तंबाखू , ड्रग्स, दारुच्या आहारी न जाता तरुणांनी आयुष्य घडवावे,पैसे देऊन रोग विकत घेऊन नयेत, व्यसनांमुळे परीवार, समाज आपल्याकडे नकारात्मक दृष्टिने पहात असतो, व्यसनाधीन व्यक्तीला चांगला समाज जवळ घेत नाही,या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.सदर प्रसंगी सदस्य स्वाती भातलवंडे, राजेश तामाने , संजय चौधरी, पांडुरंग मते, सचिन कावळे यांच्या सह कार्यक्रमाधिकारी डॉ अवधूत नवले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
