धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या उमरगा तालुका अध्यक्षपदी सिद्धेश्वर ऊर्फ पिंटू कलशेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शांताई मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण निर्मळे आणि युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटन विस्तार, समाजहिताच्या विविध योजना आणि गावागावांत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर यांनी, समाजातील मतभेद दूर करून सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर कलशेट्टी यांनीही संघटन अधिक बळकट करण्यासाठी उमरगा तालुक्यात व्यापक दौरा करण्यात येईल, तसेच लवकरच तेली समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, तालुका मार्गदर्शक म्हणून खंडू म्हेत्रे, सूर्यकांत रेवते, विजयकुमार देशमाने, रविकिरण अंबुसे, संजय कलशेट्टी, काशिनाथ निर्मळे, सदाशिव रोकडे, मल्लिनाथ दीक्षितवंत, भालचंद्र टोंपे, महादेव साखरे आणि परमेश्वर मुळजकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय, माजी तालुकाध्यक्ष संतोषदादा कलशेट्टी, शिवानंद कलशेट्टी, राजकुमार अंबुसे, इंद्रजित म्हेत्रे, बसवराज कलशेट्टी, परमेश्वर साखरे आणि विजयकुमार कलशेट्टी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी सिद्धेश्वर ऊर्फ पिंटू कलशेट्टी, उपाध्यक्षपदी बाबुराव कलशेट्टी आणि प्रवीण अंबुसे, कार्याध्यक्षपदी सतीश कलशेट्टी, कोषाध्यक्षपदी धनराज कलशेट्टी, सचिवपदी दयानंद साखरे, प्रसिद्धीप्रमुखपदी शिवकुमार दळवी, तर तालुका युवा अध्यक्षपदी युवराज साखरे यांची निवड करण्यात आली. याशिवाय, स्वस्तिक कलशेट्टी, आप्पू कलशेट्टी आणि नितीन घोडके यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
या बैठकीला मोहन टोंपे, अविनाश कलशेट्टी, फुलचंद अंबुसे, सिद्राम दीक्षितवंत, गणेश हगलहोळे, बाबुराव लकडे, प्रकाश दीक्षितवंत, संदीप अंबुसे, शेखर अंबुसे, किशोर साखरे, शिवलिंग अंबुसे, महेश हिंडोळे, सिद्राम रेवते यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
