परंडा ( प्रतिनिधी)-  परंडा तालुक्यातील नागरिकांच्या सोईसाठी परंडा लातूर उदगीर एसटी बस बार्शी कळंब मार्गे सुरू करून, तालुक्यातील नागरिकांची होत असलेली गैरसोयी दूर करावी आशी मागणी नागरीकांनी आगार प्रमुखाकडे गुरुवार दि.६ रोजी केली आहे .

परंडा आगाराच्या दोन एसटी बसेस परांड्याहून सोलापूरला जातात आणि सोलापूर येथील प्रवाशी घेऊन त्या बसेस लातूरला दररोज ये जा करत आहेत. परंडा तालुक्यातील अनेक मुले मुली लातूरला शिक्षण घेत असुन त्यांना येण्या जाण्यासाठी परंड्यातुन एकही एसटी परंडा आगाराची नाही . मात्र सोलापूर येथून लातूरला जाण्यासाठी परंडा आगाराची बस पाठवली जाते या बसेसचा परंडा तालुक्यातील नागरीकांना याचा काहीच उपयोग होत नाही, परंडा येथून परंडा लातूर असलेली बस देखील मागील वर्षभरापासून आगारातील अधिकाऱ्यांनी बंद केली आहे, परंडा तालुक्यातील प्रवाशांना लातूर, नांदेड, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा आदी शहराकडे जाण्यासाठी येथून एकही एसटी बस नाही प्रवाशांना अनेक बस बदलून त्रास सहन करून जावे लागत आहे, तरी आगारप्रमुखांनी परंडा, लातूर, उदगीर बस बार्शी, कळंब, शिराढोण मार्गे सोडण्यात यावी, अन्यथा परंडा तालुक्यातील नागरिकांना उपोषणा सारखा मार्ग स्वीकारावा लागेल आगार प्रमुखानी आपल्या स्तरावर या मागणीची गांभीर्याने दाखल घेऊन परंडा लातुर बस दररोज सकाळी सुरु करावी आशी मागणी करण्यात आली आहे . या मागणी निवेदनावर दयानंद पाटील, मुजीब काजी, श्रीराम विद्वत, आप्पासाहेब शिंदे, विजय मेहेर,फारुख शेख, जमीर मुल्ला, जाकीर पटेल,

अजिज  मुजावर, भारत ठाकूर, फारूख मुल्ला, अतुल गोफने, अंकुश जमदाडे, गफार हावरे, जाधव ए आर,  गुलाब शिंदे, सतीश शिंदे, घनश्याम शिंदे, इरफान शेख, रेहान सय्यद, शेख आर व्ही यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top