तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अपसिंगा येथे युवा नेते अमीर शेख यांच्या वतीने ईद-ए-मिलाद सणानिमित्त आपसिंगा येथे अन्नदानाचा उपक्रम राबवून शिरा व केळीचे वाटप करण्यात आले. तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश राठोड यांच्या हस्ते शिरा व केळी वाटप करण्यात आले.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने गावात परस्परांना फळे व शिरा वाटून आनंदाने सण साजरा करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावना अधिक दृढ झाली. यावेळी युवा नेते अमीर शेख, माजी सरपंच रामदास गोरे, रहेमान काझी, आदम सय्यद, सुभान नाईकवाडी, इस्माईल काझी यांच्यासह मुस्लिम बांधव, ग्रामस्थ व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईद-ए-मिलादनिमित्त आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


 
Top