धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून त्यांच्या अतुलनीय आणि प्रशंसनीय सेवेची दखल घेत त्यांना 'उत्कृष्ट सेवा पदक'जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलीस राजपत्र - सन्मान सोहळा 2026 अंतर्गत ही घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2026 च्या प्रसंगी, पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना सन्मानित केले जाते. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी जारी केलेल्या आदेशानुसार,श्री दिपक लाव्हरेपाटील यांच्या उत्कृष्ट आणि निष्ठावंत सेवेबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे 'उत्कृष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आल्याबद्दल मी अत्यंत सन्मानित आणि अभिभूत आहे.  महाराष्ट्रासाठी आणि पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रीय पातळीवरील या बहुमानाबद्दल दिपक लाव्हरे पाटील यांचे सर्वस्तरातून  अभिनंदन होत आहे.

 
Top