तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजापूर शहरातील जिजामाता नगर परिसरात दाट वस्तीतून गेलेल्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात अनेक नागरिकांची घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधण्याचे काम सुरू आहे. पोलवरील गुंतागुंतीच्या विद्युत तारांमुळे बांधकाम करताना केबल टाकण्याची महावितरणकडे मागणी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे धोकादायक विद्युत तारा हटवून नवीन केबल टाकण्यात यावी, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे.

जिजामाता नगरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून अनेक ठिकाणी विद्युत तारांचे जाळे घरांच्या अगदी जवळून गेले आहे. घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम सुरू असताना या तारांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बांधकामासाठी सळई व इतर साहित्य हाताळताना विद्युत तारांचा संपर्क होण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुंतागुंतीच्या आणि घरांच्या जवळून गेलेल्या विद्युत तारांमुळे भविष्यात जीवित अथवा वित्तहानी

होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच महावितरणने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.


 
Top