तुळजापूर (प्रतिनिधी)-  कविता समाजभान राखून राष्ट्रजागृतीचे कार्य करते असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर कौस्तुभ गावडे यांनी केले.  येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातंर्गत श्रावणसरी या शिर्षकाखाली राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. काव्यसमेलनाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री व प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कौस्तुभ गावडे बोलत होते. 

कौस्तुभ गावडे म्हणाले की, कवितेच्या माध्यमातून कमीत कमी शब्दांत माणसाच्या मनातील दुःख आणि आनंद व्यक्त होत असतो. कविता ही प्रतिकात्मक स्वरूपात वास्तववादाचे भान ठेवून निर्माण होत असते. जेंव्हा जेंव्हा समाज अधोगतीला जात असतो तेंव्हा कविता समाजाला व देशाला अधोगतीच्या अंधारातुन बाहेर काढत असते. प्रत्येक माणसाला भावना आणि संवेदना असतात. प्रत्येक देशाला आपली एक संस्कृती आणि परंपरा असते. पण प्रत्येक माणूस हा कवि होऊ शकत नाही आणि म्हणूनच कवि हा समाजाचे प्रतिनिधित्व करत असतो असे अनमोल विचार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले.

काव्यसमेलनात महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी योगीराज माने, हनुमंत पडवळ, डॉ मधुकर हुजरे,पूजा भंडारे, मनिषा पोतदार, वंदना कुलकर्णी, डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी आपल्या बहारदार कवितांची बरसात केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. सदर राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ जीवन पवार, डॉ मंत्री आर आडे, प्रा सुदर्शन गुरव यांनी पुढाकार घेतला. शेवटी कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख डॉ बापू पवार यांनी मानले.


 
Top