धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त कळंब तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत असलेल्या छायाचित्रकारांनी एकत्र येत हा दिवस उत्साहात साजरा केला.
छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून समाजातील विविध घटना, प्रसंग आणि आठवणी टिपून त्या कायमस्वरूपी जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये फोटोग्राफर्सचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कळंब तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकमेकांना जागतिक फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोग्राफी क्षेत्रातील अडचणी, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील विविध उपक्रमांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ फोटोग्राफर सूर्यकांत नारकर, बालाजी बाहेती, गजानन तोडकर, तसेच फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत खापे, सचिव अक्षय धुमाळ,संघटक नामदेव गव्हाणे, कोषाध्यक्ष दीपक माळी, सल्लागार हरीश पवार, खजिनदार खादीम सय्यद, रत्नदिप आव्हाड, रामेश्वर गुंठाळ, स्वप्नील अंधळकर, विजय माळी, यासिन शेख, गोटू कांबळे,सहदेव डिकले, यश गायकवाड, प्रतीक गायकवाड, सुजित शिंदे,सोनू शेख, शेखर शिंदे, संतोष कोठवळे आदी सदस्य उपस्थित होते.
