धाराशिव (प्रतिनिधी)-  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांना अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते. या बैठकीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. बैठकीदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. धाराशिव लोकसभेच्या विकासासाठी केंद्र शासनाचे अधिकाधिक सहकार्य मिळावे, याबाबतही सकारात्मक संवाद झाला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित सर्व खासदारांना आपल्या-आपल्या मतदारसंघातील विकासकामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून सत्तेचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे आवाहन केले. तसेच, विकासकामांमध्ये कोणतीही अडचण उद्भवल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून ती तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीतील संवादादरम्यान पंतप्रधानांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नियमित योगाभ्यासाचीही आपुलकीने विचारपूस केली व त्यांच्या योगसाधनेबाबत माहिती जाणून घेतली. 


 
Top