तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात श्रावण मासातील शुक्रवारी आलेल्या पौर्णिमेदिनी दि. 28 ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
आज घरोघरी रक्षाबंधन असल्याने बहिणीने भावाला राखी बांधून औक्षण केले. तसेच ज्यांना बहिणींना भाऊ नाही अशा बहिणींनी पक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. भाऊ नसलेल्या बहिणीने व बहीण नसलेल्या भावांनी आज तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ गर्दी केली होती. तुळजाभवानी दर्शन घेऊन त्यांनी रक्षाबंधन साजरा केला. श्रावणी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या गर्भग्रहात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली होती. आज दिवसभर मंदिरातील सर्व दर्शन रांगा भाविकांनी भरल्या होत्या.
