उमरगा (प्रतिनिधी)- श्री विठ्ठलसाई स.सा.का.लि, मुरुम कारखान्याच्या गळीत हंगाम 2026-27 साठीचे रोलरचे पुजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आमदार सवराजजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की, सध्या कारखाना कार्यक्षेत्रात साधारणतः 18 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. अपूरा पर्जन्यमान असला तरी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे. हंगाम 2026-27 मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप केले जाईल. तसेच सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरणा करण्यात आली आहे. कारखाना मशिनरी दुरुस्तीची कामे पुर्ण करण्यात येत असून ऊस उत्पादक व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मुरुम नगरपरिषदचे नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, कारखान्याचे संचालक शरण्णप्पा पत्रिके, केशवराव पवार, शिवलिंग माळी, रविंद्र चव्हाण, गणेश अंबर, नागनाथ पत्रिके, ॲड. विश्वनाथ पत्रिके, सुजित शेळके, बबन बनसोडे, सतिश पवार, संजीव पाटील, शाहुराज डोके, प्रकाश आष्टे, सचिन पाटील, नितीन रेड्डी, उमाकांतप्पा शेटे, शहर चिटणीस आदीसह कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.आर. गवसाणे, कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
