धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे तसेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक आणि गुंजोटी गावचे सुपुत्र दीपक येवते यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
नरचर अँड पीस फाउंडेशन, दिल्ली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंगेश चिवटे आणि दीपक येवते यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. सामाजिक, प्रशासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सन्मानामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, गुंजोटीचे सुपुत्र दीपक येवते यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मंगेश चिवटे यांचेही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
